Nidra Kal भवानीमातेचा निद्राकाळ

तुळजाभवानीमातेचा वर्षातून तीनदा म्हणजेच 21 दिवस निद्राकाळ असतो. याकाळात तुळजाभवानी माता नीद्राकाळात जाते असे मानून तिची मूर्ती तिच्या स्थानावरून हलवून पलंगावर नउ दिवस झोपलेल्या अवस्थेत असते. या दिवसांसाठी खास पलंगही तयार केला जातो. तसेच याकाळत करायचे पूजावीधीही वेगळया प्रकारचे असतात. या काळात मूर्तीवर पंचामृत अभिषेक केला जात नाही. याकाळात मूर्तीला तेल आणि अत्तराने मालिश केली जाते. जणू तिचा थकवा दूर करण्याचा हा एक प्रयास असतो. त्यानंतर देवीला महावस्त्र, साडी व पांघरूण घातले जाते. देवी निद्रा अवस्थेत असताना तिला फक्त नथ आणि डोळे इतकेच अलंकार घातले जातात. नंतर देवीचा मळवट भरून फुलांचा मुकुट चढवला जातो व पुष्पअलंकार घातले जातात. त्या नंतर देवीला नैवैद्य दाखवून धूपार्ती केली जाते.

महिषासूरा बरोबर झालेले युद्ध हे नउ दिवसांचे होते. नउ दिवसाच्या युद्धाची सांगता ही मातेच्या विजयाने झाली आणि मातेने महिषासूराचा वध केला. पण जणू या नउ दिवसांच्या घोर अशा युद्धामुळे माता तुळजाभवानी अत्यंतिक थकली होती. या दिवसांचे प्रतिक म्हणून हे नवरात्र म्हणजेच नउ दिवसांची पूजाविधी करण्यात येते. या दिवसांत भक्त तुळजाभवानीच्या झोपलेल्या अवस्थेतल्या मूर्तीचे दर्शन घेउ शकतात.

अशात-हेेच शारदिय नवरात्र आणि शाकंबरीदेवी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. याकाळात तंत्रमंत्र साधना करणा-या तांत्रिकांसाठी सिद्धी प्राप्त करण्यासाठी चांगला काळ समजला जातो.

भाद्रपद कृष्ण अष्टमी ते अमावास्येपर्यं असेच अश्विन शुद्ध दशमी ते अमावास्ेयपर्यंत आणि पौष प्रतिपदा ते सप्तमी पर्यंत हा निद्राकाळ असतो. आणि याच काळात नवरात्री उत्सव श्रद्धाभावाने साजरा होतो.

अशा या जगतस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेला माझे सांष्टांग नमन असो.

 

Tuljabhavani Live Darshan

Online Pooja Seva, Hotel Booking, Daily Pooja Vidhis, Darshan Program, About Mandir, How to reach, Photo Gallery, Contact, Blog